श्री दत्त आरती (त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा)

त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा ।

मागे जा
संपूर्ण आरती वाचा

त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा । त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा । नेती नेती शब्द न ये अनुमाना । सुरवर मुनिजन योगे समाधी न ये ध्यान ।। जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता । आरति ओवाळीता हरली भवचिन्ता ।। जय देव सबाह्य अभ्यंतरी तू एक्‌ दत्त । अभाग्यासी कैसी नकळे ही मात । पराही परतली कैसा हा हेत । जन्म मरणाचा पुरलासे अंत ।। जय देव दत्त येऊनीया उभा ठाकला । सद्वावे साष्टांगे प्रणिपात केला । प्रसन्न होउनीया आशीर्वाद दिधला । जन्मा मरणाचा फेरा वाचविला ।। जय देव दत्त दत्त ऐसे लागले ध्यान । हरपले मन झले उन्मन । मी तू पणाची झाली बोळवण । एका जनार्दनी श्री दत्त ध्यान ।। जय देव - संत एकनाथ