जय जय सच्यचित्स्वरूप स्वामी गणराया ।
मागे जाजय जय सच्यचित्स्वरूप स्वामी गणराया । अवतरलासी भूवर जड मूढ ताराया ।। धृ ।। निर्गुण ब्रह्म सनातन अव्यय अविनाशी । स्थिरचर व्यापुन उरले जे या जगतासी ।। तें तू खरोखर निःसंशय अससी । लीलामात्रें धरिलें मानव देहासी ।। १।। होऊं न देशी त्याची जाणिव तूं कवणा । करुनी गणि गण गणात बोते या भजना ।। धाता हरिहर गुरुवर तूंचि सुखसदना । जिकडे पहावे तिकडे तूं दिससी नयना ।। २।। लीला अनंत केल्या बकटसदनास । पेटविले त्या अग्नीवांचुनि चिलमेस ।। क्षणांत आणिले जीवन निर्जल वापीस । केला ब्रह्मगिरीच्या गर्वाचा नाश ।। ३।। व्याधि वारुन केले कैंकां संपन्न । करविलें भक्तांलागी विठ्ठल दर्शन ।। भवसिंधु हा तरण्या नौका तव चरण । स्वामी दासगणूचे मान्य करा कवन ।। ४।।