सत्राणे उड्डाणे हुंकार वदनी करि डळमळ भूमंडळ सिंधू जळ गगनी । कडाडिले ब्रह्मांड धाके त्रिभुवनी सुरवर चर निशाचर त्या झाल्या पळनी ।। १।। जय देव जय देव जय श्री हनुमंता तुमचेनी प्रसादे नाभे कृतांता जय देव जय देव फ्रधृप्र दुमदुमली पाताळे उठिला प्रतिशब्द थरथरला धरणीधर् मानीला खेद । कडाडिले पर्वत उडुगण् उच्छेद रामी रामदासा शक्तिचा शोध ।। २।। जय देव - समर्थ रामदासस्वामी