पंचानन हयवाहन सुर'भूषितनीळा । खंडामंडित दंडित दानव अवलीळा ।। मणिमल्लां मरदुनियां जों धूसुर पिवळा । हिरे कंकण बासिंगे सुमनांच्या माळा ।। १ ।। जय देव जय देव जय शिव मल्हारी । वारीं दुर्जन असुरां भवदुस्तर तारी ।। धृ ।। सुरवर संवर वर दे मजलागी देवा । नाना नामे गाईन ही तुमची सेवा ।। अघटित गुण गावया वाटतसे हेवा । फणिवर शिणला किती नर पामर केवा ।। जय ।।। २।। रघुवीरस्मरणी शंकर हृदर्यी निवाला । तो हा मल्लंतक अवतार झाला ।। यालागीं आवडे भाव वर्णिला । रामी रामदासा जिवलग भेडला ।। जय ।। ३।।