अवतार गोकुळी हो । जन तारावयासी । लावण्यरुपडे हो । तेज:ःपुंजाळ राशी । उगवले कोटिबिंब । रवि लोपला शशी । उत्साह सुरवरां । महाथोर मानसी ।। १।। जय देवा कृष्णनाथा । राईरखुमाई कांता । आरती ओवाळीन । तुम्हा देवकीसुता ।। धृ ।। कौतुक पहावया । भाव ब्रह्मयाने केली । वत्सेंही चोरूनिया । सत्यलोकासी नेलीं । गोपाल गाईवत्सें । दोन्ही ठाई रक्षिली । सुखाचा प्रेमसिंधू । अनाथांची माऊली ।। २।। चोरितां गोधनें हो । इन्द्र कोपला भारी । मेघ कडाडिला । शिला वर्षल्या धारी । रक्षिले गोकुळ हो । नखीं धरिला गिरी । निर्भय लोकपाळ । अवतरला हरी ।। ३।। वसुदेव देवकीचे । बंद फोडिली शाळ । होऊनिया विश्वजनिता । तया पोटिंचा बाल । दैत्य हे त्रासियेले । समुळ कंसासी काळ । राज्य हें उग्रसेना । केला मथुरापाळ ।। ४ ।। तारिले भक्तजन । दैत्य सर्व निर्दाळून । पांडवा साहाकारी । अडलिया निर्वाणी । गुण मी काय वर्णु । मति केवढी वानूं । विनवितो दास तुका । ठाव मागे चरणी ।। ५।।