संतजनांची आरती (आरती संतमंडळी)

आरती संतमंडळी ।।

मागे जा
संपूर्ण आरती वाचा

आरती संतमंडळी ।। हातीं घेउनिं पुष्पांजली ओंवाळिन पंचप्राणें ।। त्याचे चरण न्याहाळी ।। धृ ।। मच्छेंद्र गोरख । गैनी निवृत्तिनाथ । ज्ञानदेव नामदेव । खेचर विसोबा संत । सोपान चांगदेव । गोरा जगमित्र भक्‍त । कबीर पाठक नामा । चोखा परसा भागवत ।। आरती ।। १।। भानुदास कृष्णदास । वडवळसिद्ध नागनाथ । बहिरा पिसा मुकुंदराज । केशवस्वामी सूरदास । रंगनाथ वामनस्वामी । जनजसवंत दास ।। ।। २।। एकनाथ रामदास । यांचा हरि पर्दी वास । गुरुकृपा संपादिली । स्वामी जनार्दन त्यास । मीराबाई मुक्ताबाई । बहिणाबाई उदास । सोनार नरहरी हा । माळी सांवता दास ।। ३ ।। रोहिदास संताबाई । जनी राजाई गोणाई । जोगापरमानंदसाल्या । शेखमहंमद भाई । निंबराज बोधराज । माथा तयांचें पायीं । कूर्मदास शिवदास । मलुकदास कर्माबाई ।। ४।। नारा म्हादा गोंदा विठा । प्रेमळ दामाजी । तुकोबा गणेशनाथ । सेना नरसी महत । तुलसीदास कसांबया । पवार संतोबा भक्‍त । महिपती तुम्हां पासी । चरणसेवा मागत ।। ५।।