श्रीतुकारामांची आरती १ (आरती तुकारामा स्वामी सदुरुधामा)

आरती तुकारामा । स्वामी सदुरुधामा ।।

मागे जा
संपूर्ण आरती वाचा

आरती तुकारामा । स्वामी सदुरुधामा ।। सच्चिदानंद मूर्ती । पाय दाखवी आम्हां ।। धृ ।। राघवें सागरांत । पाषाण तारीले । । तैसे हे तुकोबाचे । अभंग उदकीं रक्षिले ।। १ ।। तुकितां तुलनेसी । ब्रह्म तुकासी आलें ।। म्हणुनी रामेश्वरें । चरणीं मस्तक ठेविलें ।। २।।