प्रपंञ्चरचना सर्वहि भोगूनि त्यागिली ।
मागे जाप्रपंञ्चरचना सर्वहि भोगूनि त्यागिली । अनुतापाचे ज्वाळी देहबुद्धि हरविली ।। वैराग्याची निष्ठा प्रगटुनि दाखविली । अहंममता दवडुनि निजशान्ती वरिली ।। १।। जय जयाजी सदुरु तुकया दातारा । तारक तू सकळांचा जिवलग सोयरा ।। धृ ।। हरिभक्तीचा महिमा विशेष वाढविला । विरक्त ज्ञानाचा ठेवा उघडुनि दाखविला ।। जगदुद्धारालागीं उपाय सुचविला । निंदक दुर्जनाचा संदेह निरसीला ।। धृ।। २।। तेरा दिवस वह्या रक्षुनियां उदकीं । कोरड्याचि काढुनि दाखविल्या शेखी ।। अपार कविताशकित्त मिणवुनि इहलोकीं । कीर्तन श्रवणें तुमच्या उद्धरति जन लोकीं ।। धृ।। ३।। बाळवे घेऊनि श्रीहरी भेटला । विधि जनिता तोचि आठव हा दीधला ।। तेणें ब्रह्मानन्दे प्रेमा डोलविला । न तुके म्हणोनि तुका नामीं गौरविला ।। धृ।। ४ ।। प्रयाणकाळीं देवें विमान पाठविलें । कळिच्या काळामाजी अद्भुत वर्तविलें ।। मानव देह घेऊनि निजधामा गेले । निळा म्हणे सकळ संत तोषविले ।। धृ।। ५।।