श्री विठ्ठल आरती २ (येई हो विठ्ठले माझे माऊली ये)

येई हो विठ्ठले माझे माऊली ये ।

मागे जा
संपूर्ण आरती वाचा

येई हो विठ्ठले माझे माऊली ये । निढळावरी कर ठेवुनि वाट मी पाहे ।।धृ ।। आलिया गेलिया हाती धाडी निरोप । पंढरपूरी आहे माझा मायबाप्‌ ।। १ ।। पिवळा पीतांबर्‌ कैसा गगनी झळकला । गरुडांवरि बैसोनि माझा कैवारी आला ।। २ ।। विठोबाचे राज्य आम्हां नित्य दिपवाळी । विष्णुदास नामा जीवेभावे ओवाळी ।। ३ ।। - संत नामदेव