वापर मार्गदर्शिका
याज्ञिकी कशी वापरावी — थोडक्यात, स्पष्टपणे.
१
फोनवर ॲपप्रमाणे कसे वापरावे?
क्रोम (Chrome) किंवा सफारी (Safari) मध्ये मेनूवर क्लिक करा आणि "Add to Home Screen" पर्याय निवडा. यामुळे तुमच्या फोनवर याज्ञिकीचा आयकॉन येईल.
२
ग्रंथ आणि आरती वाचन
अक्षरे मोठी आणि सुवाच्य आहेत. वाचन करताना फोनची स्क्रीन आपोआप बंद (Lock) पडणार नाही, याची खास काळजी यात घेतली आहे.
३
जप अनुष्ठान (स्मार्ट जपमाळ)
जप मोजण्यासाठी मणी खाली ओढा (Drag down). १०८ जप पूर्ण झाल्यावर माळ पूर्ण झाल्याचा संदेश मिळेल. चुकून बोट लागल्यास खालच्या बाजूचे 'एक जप काढा' बटण वापरा — वरचे 'मागे' बटण मुख्यपृष्ठावर नेते.
४
पूजेची सामग्री
साहित्याची यादी तयार करून एका क्लिकवर थेट यजमानांना WhatsApp वर पाठवा.