जयदेव जयदेव श्रीमद्वागवता । अ्रवणें मननें पठणें भक्ती ये हाता ।। धृ ।। वेदाचें हें सार पाहे रसभरित । दशलक्षण हें आहे लक्षीत ।। जय ।।१॥।। द्वादश स्कंधामध्यें हरीची लीळा । तिनशें पस्तिस अध्ये गाती गोपाळा ।। जय ।। २।। अठरा सहस्र श्लोक गाती ऐकती । ज्यासी हरीभक्ती त्यासी तत्प्राप्ती ।। जय ।। ३।। गायत्रीचें मंत्ररूप हें पाहें । परीक्षिति-शुकसंवाद आहे ।। जय ।। ४।। भागवतरूपी देवा तूंचि अहेसी । करूं ही आरति एका-जनार्दनासी ।। जय ।।५।।