मनोबोधाची आरती (वेदांचें जें गुह्य शास्त्रांचे जें सार)

वेदांचें जें गुह्य शास्त्रांचे जें सार ।

मागे जा
संपूर्ण आरती वाचा

वेदांचें जें गुह्य शास्त्रांचे जें सार । प्राकृत शब्दांमाजी केला विस्तार । कर्म उपासना ज्ञान गंभीर । ज्याच्या मननमात्रें आत्मा गोचर ।। जय देव जय देव जय मनोबोधा । पंचप्राणें आरति तुज स्वात्मशुद्धा ।। जय देव जय देव ।। दोन शतें पांच श्लोक हे जाण । अ्रवणें अर्थे साधक पावति हे खूण ।। परमार्थासी सुलभ मार्ग हा पूर्ण । यशवंत सद्गुरु दासाचा प्राण ।। जय देव जय देव ।।