श्री शंकर आरती १ (लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा)

लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा ।

मागे जा
संपूर्ण आरती वाचा

लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा । विषे कंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा । लावण्य सुन्दर मस्तकी वाळा । तेथुनिया जळ निर्मळ वाहे झुळझुळा ।। जय देव जय देव जय देव जय श्री शंकरा । आरती ओवाळू तुज कर्पुरगौरा ।। जय देव कर्पुरगौरा भोळा नयनी विशाळा । अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा । विभुतीचे उधळण शितकंठ नीळा । ऐसा शंकर शोभे उमावेल्हाळा ।। जय देव देवी दैत्य सागर मंथन पै केले । त्यामाजी अवचीत हलहल जे उठले । ते त्वा असुरपणे प्राशन केले । नीळकंठ नाम प्रसिद्ध झाले ।। जय देव व्याघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी । पंचानन मनमोहन मुनिजन सुखकारी । शतकोटीचे बीज वाचे उच्चारी । रघुकुळटीळक्‌ रामदासा अंतरी ।। जय देव - समर्थ रामदासस्वामी