जय जय त्र्यंबकराज गिरिजानाथा गंगाधरा हो ।
मागे जाजय जय त्र्यंबकराज गिरिजानाथा गंगाधरा हो । त्रिशूल पाणी शंभो नीलग्रीवा शशिशेखरा हो ।। वृषभारुढ फणिभूषण दशभुज पंचानन शंकरा हो । विभूतिमाळाजटा सुंदर गजचर्माबरधरा हो ।। धृ ।। पडलें गोहत्येचें पातक गौतमक्रषिच्या शिरी हो । त्याने तप मांडिले ध्याना आणुनि तुज अंतरी हो ।। प्रसन्न होऊनि त्यातें स्नाना दिधली गोदावरी हो । औदुंबरमुळी प्रगटे पावन त्रैलोक्यातें करी हो ।। जय ।। १ ।। धन्य कुशावर्ताचा महिमा वाचे वर्णू किती हो । आणिकही बहुतीतें गंगाद्वारादिक पर्वती हो ।। वंदन मार्जन करिती त्याचे महादोष नासती हो । तुझिया दर्शनमात्रे प्राणी मुक्तीतें पावती हो ।। जय ।। २।। ब्रह्मगिरींची भावें ज्याला प्रदक्षिणा जरी घडे हो । तैं ते काया कष्टें जंव जंव चरणी रुपती खडे हो ।। तंव तंव पुण्य विशेष किल्मिष अवघें त्याचें झडे हो । केवळ तो शिवरुपी काळ त्याच्या पाया पडे हो ।। जय ।। ३।। लावुनिया निजभजनी सकळही पुरविसी मनकामना हो । संतति संपत्ति देसी अंती चुकविसी यमयातना हो ।। शिव शिव नाम जपता वाटे आनंद माझ्या मना हो । गोसावीनंदन विसरे संसारयातना हो ।। जय ।। ४।।