शेषाचल अवतार तारक तूं देवा । सुरवरमुनिवर भावें करिती जन सेवा ।। कमळारमणा अससी अगणित गुण ठेवा । कमळाक्षा मज रक्षुनि सत्वर वर द्यावा ।। १ ।। जय देव जय देव जय व्यंकटेशा । केवळ करुणासिंधू पुरवीसी आशा ।। धृ ।। हें निजवैकुंठ म्हणुनि ध्यातों मी तूते । दाखविसी गुण कैसे सकळिक लोकांते ।। देखुनि तुझें स्वरूप सुख अद्भुत होतें । ध्यातों तुजला श्रीपति दृढ मानस होतें ।। जय ।। २।।