संतसनकादिक भक्त मिळाले अनेक । स्वानंदें गर्जती पाहूं आले कौतुक ।। १ ।। नवल होताहे आरती देवाधिदेवा । स्वर्गीहुनी सुरवर पाहूं येती केशवा ।। धृ ।। नर नारी तटस्थ टक पडिलें नयना । ओवाळीतां श्रीमुख धणी न पुरे मना ।।। नवल ।। २।। एका जनार्दनीं मंगल आरत्या गाती । मंगल कौतुकें गाती । मिळाले वैष्यय जयजयकारें गर्जती ।। नवल ।।३।।