अंबा आरती (सुखसदने शशिवदने अंबे मृगनयने)

सुखसदने शशिवदने अंबे मृगनयने ।

मागे जा
संपूर्ण आरती वाचा

सुखसदने शशिवदने अंबे मृगनयने । गजगमने सुरनमने कोल्हापुरमथने । सुरवर वर्षति सुमनें करुनियां नमनें । भयहरणे सुखकरणे सुंदरी शिवरमणे ।। १ ।। जय देवी जय देवी वो जय अंबे । कोल्हापुराधिस्वामिणि तुज वो जगदंबे ।। धृ ।। मृगमदमिश्रित केशर शोभत तें भाळीं । कुंचित केश विराजित मुगुटांतून भाळीं । रत्नजडित सुंदर अंगी कांचोळी । चिद्वगगनाचा गाभा अंबा वेल्हाळी ।। जय ।। २।। कंठी विलसत सगुण मुक्ता सुविशेषें । पीतांबर सुंदर कसियेला कांसे । कटितटि कांची किंकिणि ध्वनि मंजुळ भासे । पदकमळ लावण्ये अंबा शोभतसे ।। जय ।। ३।। झळझळझळझळ झळकति तानवडें कर्णी । तेजा लोपुनि गेले रविशशि निज करणीं । ब्रह्महरिहर सकळिक नेणति तव करणी । अद्वभुत लीला लिहितां न पुरे ही धरणी ।। जय ।।। ४ अष्टहि भूजा सुंदर शोभतसे । झगझगझगझगझगति लावण्यगाभा । म्हगम्हगम्हगम्हगम्हगीत समनांची शोभा ।। त्र्यंबक मधुकर होऊनि वर्णितसे अंबा ।। ५।।