नवरात्र आरती (आश्विनशुद्धपक्षीं अंबा बैसली सिंहासनी हो)

आश्विनशुद्धपक्षीं अंबा बैसली सिंहासनी हो ।

मागे जा
संपूर्ण आरती वाचा

आश्विनशुद्धपक्षीं अंबा बैसली सिंहासनी हो । प्रतिपदेपासून घटस्थापना ती करूनि हो । मूलमंत्रजप करूनी भोवतें रक्षक ठेऊनि हो । ब्रह्माविष्णुरुद्र आईचे पूजन करिती हो ।। १।॥। उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो । उदोकारे गर्जती काय महिमा वर्णू तिचा हो ।। धृ ।। द्वितीयेचे दिवशी मिळती चौसष्ट योगिनि हो । सकळांमध्ये श्रेष्ठ परशुरामाची जननी हो ।। कस्तुरीमळवट भांगी शेंदूर भरूनी हो । उदोकारें गर्जती सकळ चामुंडा मिळुनि हो ।। उदो ।।। २।। तृतीयेचे दिवशी अंबे शृंगार मांडिला हो । मळकट पातळ चोळी कंठी हार मुक्ताफळा हो ।। कंठीची पदके कांसे पीतांबर पिवळा हो । अष्टभुजा मिरविती अंबे सुंदर दिसे लीला हो ।। उदो ।। ३ ।। चतुर्थीचे दिवशी विश्वव्यापक जननी हो । उपासकां पाहसी अंबे प्रसन्न अंत:करणीं हो ।। पूर्ण कृपे पाहसी जगन्माते मनमोहिनी हो । भक्तांच्या माऊलि सुर ते येती लोटांगणी हो ।। उदो ।। ४ ।। पंचमीचे दिवशीं व्रत तें उपांगललिता हो । अर्घ्यपाद्यपूजनें तुजला भवानी स्तविती हो ।। रात्रीचे समयी करिती जागरण हरिकथा हो । आनंदें प्रेम तें आलें सद्धावें क्रीडता हो ।। उदो ।। ५।।

षष्ठीचे दिवशी भक्तां आनंद वर्तला हो । घेऊनि दिवट्या हस्ती हर्षे गोंधळ घातला हो ।। कवडी एक अर्पितां देसी हार मुक्‍तफलांचा हो । जोगवा मागतां प्रसन्न झाली भक्‍तकुळा हो ।। उदो ।। ६।। सप्तमीचे दिवशी सप्तशृंगगडावरी हो । तेथें तूं नांदसी भोवतें पुष्पे नानापरी हो ।। जाईजुईशेवंती पूजा रेखियली बरवी हो । भक्‍तसंकटी पडतां झेलूनि घेसी वरचे वरी हो ।।। उदो ।।७॥। अष्टमीचे दिवशी अष्टभुजां नारायणी हो । सह्याद्रीपर्वती पाहिली उभी जगज्जननी हो ।। मन माझें मोहिलें शरण आलों तुजलागुनी हो । स्तनपान देऊनि सुखी केली अंत:करणीं हो ।। उदो ।। ८ ।। नवमीचे दिवशी नवदिवसांचें पारणें हो । सप्तशतीजप होम हवनें सद्गक्‍ती करूनी हो ।। षडूस अन्न नैवेद्यासी अर्पियली भोजनी हो । आचार्यब्राह्मणां तृप्त केलें कृपेंकरूनी हो ।। उदो ।। ९।। दशमीच्या दिवशी अंबा निघे सीमोल्लंघनी हो । सिंहारूढे दारुण शस्त्रें अंबे त्वां घेऊनी हो ।। शुंभनिशुंभादिक राक्षसा किती मारिसी रणी हो । विप्रा रामदासा आश्रय दिधला तो चरणी हो ।। उदो ।। १०।।