दुर्गा आरती (दुर्ग दुर्घटभारी तुजवीण संसारी)

दुर्ग दुर्घटभारी तुजवीण संसारी ।

मागे जा
संपूर्ण आरती वाचा

दुर्ग दुर्घटभारी तुजवीण संसारी । अनाथ नाथे अम्बे करुणाविस्तारी । वारी वारी जन्म मरणांते वारी । हारी पडलो आता संकट नेवारी ।। १।। जय देवी जय देवी महिषासुरमथिनि । सुरवर ईश्वर वरदे तारकसंजीवनी ।। धृ।। तुजवीण भुवनी पाहता तुज ऐसे नाही । चारी श्रमले परंतु न बोलवे काही । साही विवाद करिता पडले प्रवाही । ते तू भक्‍्तालागी पावसि लवलाही ।। २।। प्रसन्न वदने प्रसन्न होसी निजदासा । क्लेशांपासुनी सोडवी तोडी भवपाशा । अम्बे तुजवाचून्‌ कोण पुरवील्‌ आशा । नरहरी तल्लीन झाला पदपंकजलेशा ।। ३।। - नरहरी सोनार