श्रीहरितालिकेची आरती (जयदेवी हरितालिके सखी पार्वती अंबिके)

जयदेवी हरितालिके । सखी पार्वती अंबिके ।।

मागे जा
संपूर्ण आरती वाचा

जयदेवी हरितालिके । सखी पार्वती अंबिके ।। आरती ओवाळीतें । ज्ञानदीपकळिके ।। धृ ।। हरअर्धांगीं वससी । जासी यज्ञा माहेरासि ।। तेथें अपमान पावसी । यज्ञकुंडींत गुप्त होसी ।। १।। रिघसी हिमाद्रीच्या पोटी । कन्या होसी तू गोमटी ।। उग्र तपश्चर्या मोठी । आचरसी उठाउठी ।। २।। तापपंचाग्निसाधनें । धूम्रपानें अधोवदनें ।। केली बहू उपोषणें । शंभु भ्रतारकारणे ।। ३।। लीला दाखविसी दृष्टी । हें द्रुत करिसी लोकांसाठी ।। पुन्हा वरिसी धूर्जटी । मज रक्षावे संकटीं ।। ४।। काय वर्णू तव गुण । अल्पमति नारायण ।। मातें दाखवी चरण । चुकवावें जन्म मरण ।। ५ ।।