श्री मंगळागौरीची आरती (जय देवी मंगळागौरी)

जय देवी मंगळागौरी । ओंवाळीन सोनियाताटीं ।।

मागे जा
संपूर्ण आरती वाचा

जय देवी मंगळागौरी । ओंवाळीन सोनियाताटीं ।। रत्नांचे दिवे । माणिकांच्या वाती । हिरेया ज्योती ।। धृ ।। मंगळमूर्ती उपजली कार्या । प्रसन्न झाली अल्पायुषी राया ।। तिष्ठली राज्यबाळी । अयोषण द्यावया ।।१।। पूजेला ग आणिती जाईजुईच्या कळ्या । सोळा तिकटीं सोळा दूर्वा ।। सोळा परींची पत्री । जाई जुई आबुल्या शेवंती नागचांफे ।। पारिजातकें मनोहरें । नंदेटें तगरें । पूजेला ग आणिली ।। २।। साळीचे तांदुळ मुगाची डाळ । आळणीं खिचडी रांधिती नारी ।। आपुल्या पतीलागीं सेवा करिती फार ।। ३।। डुमडुमें डुमडुमें वाजंत्री वाजती । कळावी कांकणें गौरीला शोभती ।। शोभली बाजुबंद । कानीं कापांचे गवे । ल्यायिली अंबा शोभे ।। ४ ।। न्हाउनी माखुनी मौनी बैसली । पाटाबाची चोळी क्षीरोदक नेसली ।। स्वच्छ बहुत होउनी अंबा पुजूं लागली ।। ५।। सोनिया ताटीं घातिल्या पंचारती । मध्यें उजळती कापुराच्या वाती ।। करा धूप दीप । आतां नैवेद्य षडस पक्‍्वानें । तटीं भरा बोनें ।।। ६।। लवलाहें तिघें काशीसी निघाली । माउली मंगळागौर भिजवूं विसरली ।। मागुती परतुनीयां आली । अंबा स्वयंभू देखिली । । देउळ सोनियाचे । खांब हिरेयांचे । कळस वरती मोतियांचा ।।७।।