श्री रामचंद्रांची आरती १ (उत्कट साधुनि शिळा सेतु बांधोनी)

उत्कट साधुनि शिळा सेतु बांधोनी ।

मागे जा
संपूर्ण आरती वाचा

उत्कट साधुनि शिळा सेतु बांधोनी । लिंगदेह लंकापुर विध्वंसूनी ।। कामक्रोधादिक राक्षस मर्दूनी । देह अहंभाव रावण निवटोनी ।। १ ।। जय देव जय देव निजबोधा रामा । परमार्थ आरती सद्धावें आरती परिपूर्णकामा ।। धृ ।। प्रथम सीताशुद्धी हनुमंत गेला । लंका दहन करुनी अखया मारिला ।। मारिला जंबूमाळी भुवनी त्राहाटीला । आनंदाची गुढी घेऊनियां आला ।। जय ।।२।। निजबळें निजशक्ति सोडविली सीता । म्हणूनि येणें झालें अयोध्ये रघुनाथा ।। आनंदें वोसंडे वैराग्य भरता । आरती घेऊन आली कौसल्या माता ।। जय ।।३।। अनाहतध्वनी गर्जती अपार । अटरा पद्यें वानर करिती भुभुःकार ।। अयोध्येसी आले दशरथकुमार । नगरीं होत आहे आनंद थोर ।। ।। जय ।।४॥।

सहज सिंहासनीं राजा रघुवीर । सो$हंभावें तया पूजा उपचार ।। सहजांची आरती वाद्यांचा गजर । माधवदासा स्वामी आठव ना विसर ।। जय देव जय देव निजबोधा रामा । परमार्थ आरती सद्धावें आरती परिपूर्णकामा ।। ५ ।।

औरामचंद्रांची आरती २ त्रिभुवनमंडित माळ गळां । आरति ओवाळू पाहूं ब्रह्मपुतळा ।। १।। श्रीराम जयराम जयजय राम । आरति ओंवाळूं पाहूं सुंदर मेघश्याम ।। धृ ।। ठकाराचे ठाण वारीं धनुष्य बाण । मारुती सन्मुख उभा कर जोडून ।। २।। भरतशत्रुघ्न दोघे चामर ढाळिती । स्वर्गाहून देव पुष्पवृष्टी करीती ।। ३ ।। रत्नजडित हार वर्णू काय मुकुटी । आरती ओंवाळूं चौदा भुवनांच्या कोटी ।। ४ ।। विष्णुदास नामा म्हणे मागतो तूतें । आरती ओंवाळूं पाहूं सीतापतीतें ।। ५ ।।

शी रामचंद्रांची आरती ३ स्वस्वरूपोन्मुबुद्धि वैदेही नेली । देहात्मकाभिमानें दशग्रीवें हरिली । सद्विवेकमारूतिनें तच्छुद्धि आणिली । तव चरणांबुजि येऊनि वार्ता श्रुत कली ।। १।। जय देव जय देव जय निजबोधा रामा । परमार्थे आरती सद्भावें आरती परिपूर्णकामा ।। धृ ।। उत्कट साधुनि शिळा सेतु बान्धोनि । लिंगदेहलंकापुरी विद्धवंसोनी । कामक्रोधादिक राक्षस मर्दूनी । देह अहंभाव रावण निवटोनि ।। जय ।। २।। प्रथम सीताशोधी हनुमन्त गेला । लंकादहन करूनी सखया मारीला । वधिला जंबूमाळी भुवनी त्राहटीला । आनंदाची गुढी घेऊनिया आला ।। जय ।। ३ निजबळें निजशक्‍ती सोडविली सीता । म्हणुनी येणें झाले अयोध्ये रघुनाथा । आनंदे ओसंडे वैराग्य भरता । आरती घेऊनि आली कौसल्या माता ।। जय ।। ४ ।। अनुहत वाजिंत्रध्वनि गर्जती अपार । अठरा पद्धे वानर करिती भुभुःकार । अयोध्येसी आले दशरथ कुमार । नगरी होत आहे आनंद थोर ।। जय ।।५।।

सहज सिंहासनी राजा रघुवीर । सोहंभावें तया पूजा उपचार । सहजांची आरती वाद्यांचा गजर । माधवदासस्वामी आठव ना विसर ।। जय ।।६।।