रत्नांची कुंडलें माला सुविराजे । झळझळ गंडस्थळ घननीळ तनू साजे । घंटा किंकिणि अंबर अभिनव गति साजे । अंदु वांकी तोडर नुपुर ब्रीद गाजे ।। १।। जय देव जय देव जय रघुवर ईशा । आरती निर्जरवर ईशा जगदीशा ।। धृ ।। राजिव लोचन मोचन सुरवर नरनारी । परातपर अभयंकर शंकर वरधारी । भूषणमंडित उभा त्रिदश कैवारी । दासा मंडण खंडण भवभय अपहारी ।। जय देव ।। २।।
शी रामचंद्रांची आरती ५ काय करूं गे माय आतां कवणा ओंवाळूं । जिकडे पाहे तिकडे राजाराम कृपाळू ।। धृ ।। ओंवाळूं गे माय निजमूर्ति रामा । रामरूपी दुजेपणा न दिसे आम्हा ।। १।। सुरवर नर वानर अवघा राम सकल । दैत्य निशाचर तेही राम केवळ ।। २।। त्रैलोक्यस्वरूपें राम संचारला एक । सदुरुकृपें केशवराजी आनंद देख ।। ३।।