त्रिभुवनमंडित माळ गळां । आरति ओवाळू पाहूं ब्रह्मपुतळा ।। १ ।।
मागे जात्रिभुवनमंडित माळ गळां । आरति ओवाळू पाहूं ब्रह्मपुतळा ।। १ ।। श्रीराम जयराम जयजय राम । आरति ओवाळू पाहूं सुंदर मेघश्याम ।। धृ ।। ठकाराचे ठाण वारीं धनुष्य बाण । मारुती सन्मुख उभा कर जोडून ।। २ ।। भरतशत्रुघ्न दोघे चामर ढाळिती । स्वर्गाहून देव पुष्पवृष्टी करीती ।। ३ ।। रत्नजडित हार वर्णू काय मुकुटी । आरती ओवाळू चौदा भुवनांच्या कोटी ।। ४ ।। विष्णुदास नामा म्हणे मागतो तूंतें । आरती ओवाळू पाहूं सीतापतीतें ।। ५ ।।