तुळशीची आरती (जय देवी जय देवी जय तुळसी)

जय देवी जय देवी जय तुळसी ।

मागे जा
संपूर्ण आरती वाचा

जय देवी जय देवी जय तुळसी । निजपत्राहुनि लघुतर त्रिभुवन हे तुळिसी ।। धृ ।। ब्रह्मा केवळ मुळीं मध्यें तो शौरी । अग्नी शंकर तीर्थे शाखा परिवारीं ।। सेवा करिती भावें सकळहि नरनारी । दर्शनमात्रे पापें हरती निर्धारी ।। १।। शीतळ छाया भूतळव्यापक तूं कैसी । मंजिरीची बहु आवड कमळारमणासी ।। तव दलविरहित विष्णू राहे उपवासी । विशेष महिमा तुझा शुभ कार्तिकमासीं ।। २।। अच्युत माधव केशव पीतांबरधारी । तुझिया पूजनकाळीं जो हें उच्चारी ।। त्यासी देसी संतति संपति सुखकारी । गोसावीसुत विनवी मजला तूं तारी ।। ३।।