वटसावित्रीची आरती (अश्वपती पुसता झाला)

अश्वपती पुसता झाला । नारद सांगताती तयाला ।।

मागे जा
संपूर्ण आरती वाचा

अश्वपती पुसता झाला । नारद सांगताती तयाला ।। अल्पायुषी सत्यवंत । सावित्रीने का प्रणीला ।। आणखी वर वरी बाळे । मनीं निश्चय जो केला ।। आरती वडराजा ।।१।। दयावंत यमदूजा । सत्यवंत ही सावित्री ।। भावे करीन मी पूजा । आरती वडराजा ।। धृ ।। ज्येष्ठामास त्रयोदशी । करिती पूजन वडाशीं ।। त्रिरात्र ब्रत करूनीया । जिंकी तूं सत्यवंताशी । आरती वडराजा ।।२।। स्वर्गावरी जाऊनियां । अग्निखांब कचळीला ।। धर्मराजा उचकला । हत्या घालील जीवाला । येई ग पतिब्रते ।। पती नेई गे आपुला ।। आरती वडराजा ।।३।। जाऊनियां यमापार्शी । मागतसे आपुला पती ।।। चारी वर देऊनियां । दयावंता द्यावा पती ।। आरती वडराजा ।।४।। पतित्रते तुझी कीर्ति । ऐकुनी ज्या नारी ।। तुझें व्रतें आचरती । तुझी भुवनें पावती ।। आरती वडराजा ।।५।। पतित्रते तुझी स्तुती । त्रिभुवनी ज्या करिती ।। स्वर्गी पुष्पवृष्टी । करुनियां आणिलासी आपुला पती । अभय देऊनियां । पतित्रते तारी त्यासी ।। ६।।