आरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रह्म । भक्तसंकटीं नाना स्वरूपी स्थापिसी स्वधर्म ।। धृ ।। अंबक्र्षीकारणें गर्भवास सोशीसी । वेद नेले चोरूनी ब्रह्मा आणुनियां देसी ।। मत्स्यरूपी नारायण सप्तही सागर धुंडीसी । हस्त लागतां शंखासुरा तुझा वर देसी ।। १।। रसातळाशीं जातां पृथ्वी पाठीवर घेसी । परोपकारासाठीं देवा कांसव झालासी ।। दाढें धरूनी पृथ्वी नेतां वराहरूप होसी । प्रल्हादाकारणें स्तं्भी नरहरि गुरगुरसी ।। २।। पांचवे अवतारीं बळिच्या द्वाराला जासी । भिक्षे स्थळ मागुनी बळिला पाताळीं नेसी ।। सर्व समर्पण केलें म्हणउनि प्रसन्न त्या होसी ।। वामनरूप धरूनी बळिच्याद्वारी तिष्ठसी ।। ३ ।। सहसाार्जुन मातला जमदग्नीचा वध केला । करष्टी ते रेणुका म्हणुनी सहरुार्जुन वधिला ।। निःक्षत्री पृथ्वी दान दिधली विप्राला । सहावा अवतार परशुराम प्रगटला ।। ४ ।। मातला रावण सर्वा उपद्रव केला । तेहतीस कोटी देव बंदीं हरलें सीतेला ।। पितृवचनालागीं रामें वनवास केला । मिळोनी वानर सहित राजाराम प्रगटला ।। ५।।
देवकीवसुदेव बंदीमोचन त्वां केलें । नंदाघरीं जाउन निजसुख गोकुळा दिधलें ।। गोरसचोरी करीतां नवलक्ष गोपाळ मिळविले । गोपिकांचें प्रेम देखुनि श्रीकृष्ण भुलले ।। ६ ।। बौद्ध कलंकी कलियुरगि । झाला अधर्म हा अवघा । सांडुनि नित्यधर्म सोडुनि नंदाची सेवा ।। म्लेंच्छमर्दन करिसी म्हणुनि कलंकी केशवा । बहिरवि जान्हवि द्यावि निजसुखानंदसेवा ।। ७।।