जय देव जय देव पंढरीराया । धूप अर्पीतसें मी भावें तव पायां ।। धृ।। सोज्ज्वळ अग्निरूप निजतेजोराशी । अहंभाव धूप कृपें जाळीसी ।। त्याचा आनंद माझे मानसीं । तव दर्शनमोदें सुख हें सर्वांसी ।। १।। पूर्णानंद देवा तूं सच्चिदानंदा । परमात्मा तूं अससी आनंदकंदा ।। पूर्ण करीं तूंची भक्तांच्या छंदा । अंगीकारुन धूप दे ब्रह्मानंदा ।। २।।