भक्तीचिये पोटी बोध कांकडा ज्योती । पंचप्राण जीवेंभावें ओवाळूं आरती ।।१।। ओवाळूं आरती माझ्या पंढरीनाथा । दोन्ही कर जोडूनि चरणीं ठेविला माथा ।। धृ ।। काय महिमा वर्णू आतां सांगणें तें किती । कोटी ब्रह्महत्या मुख पाहतां जाती ।। २।। राही रखुमाबाई उभ्या दोन्ही दों बाहीं । मयूरपिच्छचामरें ढाळिती ठाईंच्या ठाई ।। ३।। विटेसहित पाय म्हणुनी भावें ओवाळूं । कोटी रवि शशी दिव्य उगवले हेळू ।। ४ ।। तुका म्हणे दीप घेउनी उन्मनींत शोभा । विटेवरी उभा दिसे लावण्यगाभा ।। ५ ।।