अघसंकटभयनाशन सुखदा विग्धेशा । आद्या सुरवरवंद्या नरवारण वेशा ।। पाशांकुशधर सुंदर पुरवीसी आशा । निजवर देऊनि हरिसी भ्रांतीच्या पाशा ।। ।। १।। जय देव जय देव जय सुखकर मूर्ती । गणपति हरी शिवभास्कर अंबा सुखमूर्ती ।। धृ ।। पयसागरजाकांता धरणीधरशयना । करुणालय वारिसि भववारिजदलनयना ।। गरुडध्वज भजन प्रिय पीतप्रभवसना । अनुदिनिं तव कीर्तनरस चाखो हे रसना ।। जय ।। २ नंदीवहना गहना पार्वतिच्या रमणा । मन्मथदहना शंभो वातातमजनयना ।। सर्वोपाय विवर्जित तापत्रयशमना । कैलासाचलवासा करिसी सुरनमना ।। जय ।। ३।। पद्मयबोधकरणा नेत्रभ्रमहरणा । गोधन बंधनहरता द्योतक आचरणा ।। किरण स्पर्श वारेसि या तम आवरणा । शरणागत भयनाशन सुखवर्धनकरणा ।। जय ।। ४ ।। त्रिभुवनउत्पति पालन करिसीडइ तूं माया । नाहीं तुझिया रूपा दुसरी उपमा या ।। तुझा गुणगणमहिमा न कळे निगमा या । करुणा करिसी अंबे मनविश्रामा ।। जय ।। ५॥।