कांकड आरती १ (उठा उठा हो साधक)

उठा उठा हो साधक । साधा आपुलालें हित ।।

मागे जा
संपूर्ण आरती वाचा

उठा उठा हो साधक । साधा आपुलालें हित ।। गेला गेला हा नरदेह । मग कैंचा भगवंत ।। १।। उठा उठा हो वेगेंसीं । चला जाऊं राऊळासी ।। हरतिल पातकांच्या राशी । कांकड आरती पाहोनी ।। धृ ।। उठोनियां हो पाहाटें । पाहा विठ्ठल उभा विटे ।। चरण तयाचे गोमटे । अमृतदृष्टीं अवलोका ।। २।। जागें करा रुक्मिणीवरा । देव आहे निजसुरा ।।। वेगें निंबलोण करा । दृष्ट होईल तयासी ।। ३।। पुढें वाजंत्री । ढोल दमामे गर्जती ।। होत कांकड आरती । माझ्या पंढरीरायाची ।। ४ ।। सिंहनाद शंख भेरी । गजर होतो महाद्वारी ।। केशवराज विटेवरी । नामा चरण वंदितो ।। ५।।