दीपारती (जय देव जय देव जय पांडुरंगा)

जय देव जय देव जय पांडुरंगा ।

मागे जा
संपूर्ण आरती वाचा

जय देव जय देव जय पांडुरंगा । दीपारति ओवाळूं तुजला जिवलगा ।। धृ ।। स्वयंप्रकाशा तूझी सर्वही दीप्ति। । पूर्णानंद प्राप्त करितां तव भक्ति ।। देहत्रय वाती पाजळोनी प्रीती । ओवाळितों प्रेमें देवा तुजप्रती ।। १।॥। देव तुज पाहता येतो प्रेमपूर । नाम निरंतर गातां होतो भवपार ।। वाटे तव भक्‍ती ही प्रियकर । विष्णुदासा देई अखंड हा वर ।। २।।