नैवेद्य आरती (जय देव जय देव जय विठाबाई)

जय देव जय देव जय विठाबाई ।

मागे जा
संपूर्ण आरती वाचा

जय देव जय देव जय विठाबाई । पक्‍्वान्नादी सिद्धी अर्पी तुज ठायीं ।। धृ।। षडूसपक्‍्वान्नें हीं अर्पित तुज माई । कृपा करुनी तीं तूं मान्य करुनि घेई ।। तृप्ती सर्व जीवां जेवितां तूं आई । जीवन सर्वांचे हें असे तव पायीं ।।१॥। आनंदें भोजन करावें आतां । यथेच्छ जेवूनी उच्छिष्ट उरतां ।। प्रसाद तो देई आपुल्या भक्ता । हेंचि मागें ठेवूनि तव चरणीं माथा ।। २।।