नीरांजन आरती (पंचप्राणांचें नीरांजन करुनी)

पंचप्राणांचें नीरांजन करुनी ।

मागे जा
संपूर्ण आरती वाचा

पंचप्राणांचें नीरांजन करुनी । पंचतत्त्वें वाती परिपूर्ण भरुनी ।। मोहममतेनें समूळ भिजवोनी । अपरोक्ष प्रकाश दीप पाजळोनी ।। १।। जय देव जय देव जय नीरांजना । नीरांजन ओवाळूं तुझिया समचरणा ।। धृ।। ज्वाला ना काजळी दिवस न राती । सदोदित प्रकाश भक्‍्तीनें प्राप्ती ।। पूर्णानंदें धालों बोलों मी किती । उजळों हे शिवराम भावें ओंवाळीती ।। २।। ।। धृ।।