निरोप आरती (जाहलें भजन आम्ही नमितों चरणा)

जाहलें भजन आम्ही नमितों चरणा । नमितों तव चरणा ।

मागे जा
संपूर्ण आरती वाचा

जाहलें भजन आम्ही नमितों चरणा । नमितों तव चरणा । वारुनिया विघ्नें देवा रक्षावे दीना ।। धृ ।। दास तुझे आम्ही देवा तुजलाची ध्यातों । देवा तुजलाची ध्यातों । प्रेमे करुनियां देवा गुण तुझे गातों ।। १ ।। तरी न्यावी सिद्धी देवा हेची वासना । देवा हेची वासना । रक्षूनियां सर्वा द्यावी आम्हासी आज्ञा ।। २।। मागणें तें देवा आतां एकची आहे । आतां एकची आहे । तरुनियां सकळां आम्हां कृपादृष्टी पाहें ।। ३ ।। जेव्हां सर्व आम्ही मिळूं ऐशा या ठाया । ऐशा या ठाया । प्रेमानंद लागू तुझी कीर्ती गावया ।। ४ ।। सदा ऐशी भक्ती राहो आमुच्या मनीं । आमुच्या मनीं । हेची देवा तुम्हा असे नित्य विनवणी ।। ५।। वारुनियां संकटें आतां आमुचीं सारी। आतां आमुची सारी । कृपेची साउली देवा दीनावरि करीं ।। ६।। निरंतर आमुची चिंता तुम्हां असावी । चिंता तुम्हा असावी । सर्वांची लज्जा देवा तुम्ही रक्षावी ।। ७।। निरोप घेतों आतां आम्हां आज्ञा असावी । चुकलें आमुचें कांहीं त्याची क्षमा असावी ।।