जमदग्नीकुळभूषण मुक्ता फळदशना । अतिसज्जन मनमोहनरजनीकरवदना । अगणित महिमा तुझा न कळे सुरगणा । वदतो कंठी वाणी सरसीरुहनयना ।। १।। जय राम श्रीराम जय भार्गवरामा । नीरांजन करूं तुजला परिपूर्णकामा ।। धृ ।। सह्याद्रिगिरिशिखरीं शर घेऊनी येसी । सोडुनी शर पळवीसी पश्चिमजलधीसी । तुजसम रणधीर जगी न पडे दृष्टीसी । प्रताप थोर तुझा न कळे कवणासी ।। जय ।। २।। तव कोप बहु पापी बा संहारी । दानव दहन करोनी वससी गिरिशिखरी । क्षत्रिय मारूनि अवनी केली निर्वेरी । सात्विक राजस तामस त्रिगुणां उद्धरी ।। जय ।। ३।। दृढ भावे तव वंदन करिती जे चरणी । त्यांचे भवभय नाही जंववरि शशितरणी । शर मारुनी उद्भवली गंगा जनतरणी । चिंतामणि शरणागत निश्चल तव चरणी ।। जय ।।४॥।