आरती रामदासा । भक्त विरक्त ईशा ।। उगवला ज्ञानसूर्य । उजळोनी प्रकाशा ।। धृ ।। साक्षात् शंकराचा । अवतार मारुती ।। कलिमा्जी तेचि जाली । रामदासाची मूर्ती ।। १।। वीसही दशकांचा । दासबोध ग्रंथ केला ।। जडजीवां उद्धरीलें । नृप शिवासी तारिलें ।। २।। ब्रह्मचर्य व्रत ज्याचें । रामरूप सृष्टि पाहे । कल्याण तिहीं लोकीं । समर्थ सहुरुपाय ।। ३।।
दासबोधांची आरती वेदांतसंमतीचा काव्यसिंधू भरला । श्रुतिशास्त्रग्रंथ साक्ष संगमू केला ।। महानुभव संतजनी अनुभव चाखियला । अज्ञान जड जीवां मार्ग सुगम केला ।। १।। जय जयाजी दासबोधा ग्रंथराज प्रसिद्धा । आरती ओंवाळीन विमलज्ञान बाळबोधा ।। धृ ।। नवविधा भक्तिपंथें रामरूपानुभवी । चातुर्यनिधि मोठा मायाचक्र उघवी ।। हरिहर हृदयीचे गुह्य प्रगट दावीं । बद्धची सिद्ध झाले असंख्यात मानवी ।। जय ।। २।। वीसही दशकींचा अनुभव जो पाहे । नित्यनेमें विवरीतां स्वयें ब्रह्मची होये ।। अपार पुण्य गांठी तरी श्रवण लाही । कल्याण लेखकाचे भावगर्भ हृदर्यी ।। जय ।। ३ ।।